Hathras Gangrape: हाथरस बलात्कार प्रकरण बनावट; भाजपा आमदार मोहन मंडावींच विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 00:22 IST2020-10-14T00:21:20+5:302020-10-14T00:22:12+5:30
बस्तर विभागात महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात. हाथरसमधील घटना बनावट असताना काँग्रेसचे नेते तेथे गेले; परंतु येथे जे घडत आहे त्याकडे आमदार आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल लक्ष देत नाहीत, असे मंडावी म्हणाले.

Hathras Gangrape: हाथरस बलात्कार प्रकरण बनावट; भाजपा आमदार मोहन मंडावींच विधान
कोंडागाव (छत्तीसगड) : हाथरस येथील दलित मुलीवरील बलात्काराचे कथित प्रकरण हे ‘बनावट’ असून त्या प्रकरणात कोणतीही दडपशाही करण्यात आलेली नाही, असे भाजपचे छत्तीसगडमधील खासदार मोहन मंडावी यांनी म्हटले.
कोंडागावात सभेत बोलताना मंडावी यांनी हाथरसमधील प्रकरणाचा निषेध करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार टीका केली. हाथरसमध्ये दडपशाही करण्यात आल्याची टीका करणाºया काँग्रेसच्या नेत्यांनी बस्तरमध्ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यावर तेथे का भेट दिली नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. हाथरसमध्ये कोणतीही दडपशाही झालेली नाही. जेथे काही घडलेलेच नाही तेथे काँग्रेसचे नेते जातात. प्रकरणे बनावट करून दडपशाही झाल्याचे सांगतात. जर सीबीआय चौकशी झाली तर अशा घटना प्रत्येक चार ते पाच खेड्यांत सापडतील, असे म्हणाले. मंडावी म्हणाले, बस्तर विभागात महिलांवर अनेक प्रकारचे अत्याचार होतात. हाथरसमधील घटना बनावट असताना काँग्रेसचे नेते तेथे गेले; परंतु येथे जे घडत आहे त्याकडे आमदार आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल लक्ष देत नाहीत, असे मंडावी म्हणाले.