मुंबई : गेल्याच आठवड्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यापाठोपाठ आता गृहराज्यमंत्र्यांनाही कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे देशमुखांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलदेखील आले होते. Home Minister of state Satej (bunty patil) patil corona Positive
बंटी पाटील यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असून प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांनी पोलीस दलाची बैठक घेतली होती. यानंतर राष्ट्रवादी परिवार संवाद या पक्षीय कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील सर्वच महत्त्वाचे पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्ते संपर्कात आले. अनिल देशमुखांनी पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. पत्रकारांचाही संपर्क आला. पुढे परतवाड्याला त्यांचे जाणे झाले. तेथेही अनेकांशी संपर्क आला. आता गृहराज्यमंत्री देखील कोरोना बाधित आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ठाकरे सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये अजित पावर, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड आदींचा नंबर होता. मात्र, त्यानंतर खूप वेळाने पुन्हा मंत्र्यांना कोरोनाने गाठले आहे. एकीकडे सामान्यांना लोकल सेवा सुरु होत असताना मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.