नवी दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कोरोना महामारीच्या संकटात ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांकडून होणाऱ्या राजनीतीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. महामारी आणि संकटाच्या या काळात काँग्रेसच्या वागण्यामुळे मी दु:खी झालोय पण आश्चर्य वाटत नाही. तुमच्या पक्षातील काही नेते जनतेच्या मदतीसाठी स्त्युत्य काम करत आहेत असं या पत्रात म्हटलं आहे.
४ पानांच्या या पत्रात जे पी नड्डा पुढे म्हणतात की, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून पसरत असलेल्या नकारात्मकतेमुळे या स्त्युत्य कामाला ग्रहण लागत आहे. कोरोनाच्या लढाईत भारत अत्यंत धैर्याने लढा देत आहे अशावेळी प्रत्येकाची इच्छा असेल की काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांची दिशाभूल करणं थांबवावेत. लोकांमध्ये खोटं भीतीचं वातावरण निर्माण केले जात आहे. त्याशिवाय राजकीय विरोधासाठी काँग्रेस नेते सातत्याने बाजू मांडत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.
गरीब, वंचित लोकांसाठी मोफत लस
नड्डा यांनी पुढे लिहिले की, गरीब आणि वंचित लोकांना विनामूल्य लसीकरण करण्याची घोषणा भाजपा आणि एनडीए सरकारने आधीच केली आहे. मला खात्री आहे की कॉंग्रेस सरकारही गरिबांना असेच वाटेल. राज्यातील कॉंग्रेस सरकार अशाच प्रकारे मोफत लस देण्याची घोषणा करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तुमचं पत्र आलं नाही पण मी उत्तर देतोय
'मला माध्यमांद्वारे कळले की तुम्ही मला १ नोव्हेंबर २०२० रोजी एक पत्र लिहिले होते, परंतु मला आतापर्यंत असे कोणतेही पत्र मिळाले नाही. आपण हे पत्र फक्त माध्यमांसाठी तयार केलं असावं असं मला वाटतं. ते केवळ राजकारणासाठी होते हा हेतू दिसतो. माध्यमातून पोहचलेल्या या पत्राचं उत्तर मी तुम्हाला देतो जेणेकरून लोकांची दिशाभूल करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही असा टोला जे पी नड्डा यांनी सोनिया गांधींना लगावला आहे.
भारतात बनललेली लस एका पक्षाची नाही
लसीकरणाचं विकेंद्रीकरण करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. परंतु तुम्ही काँग्रेस कार्यसमितीच्या नेत्यांशी संवाद साधला नाही का? भारतात बनलेली लस ही कोणत्याही पक्षाची नाही. ती देशाची आहे. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात १६ कोटी लोकांना लस दिली आहे. गरिबांना मोफत लस घेण्याची घोषणा सरकारने केली आहे. आता काँग्रेस नवा डाव खेळत आहे. सगळं खापर सेंट्रल विस्टा प्रकल्पावर टाकून द्या. नवीन संसद भवन बांधण्याची मागणी यूपीए सरकार असताना केली होती. तत्कालीन लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी यावर प्रश्नचिन्ह विचारण्यापेक्षा काँग्रेस छत्तीसगडमध्ये नवीन विधानसभा परिसराचं काम करते ते पाहावं. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं वागणं कायम लक्षात राहील. त्यांनी कधी लॉकडाऊनचा विरोध केला तर कधी समर्थनात आले. काँग्रेसने केरळमध्ये निवडणूक रॅली काढली आणि दुसऱ्या राज्यातील रॅलींना विरोध केला होता असा आरोप जे. पी नड्डा यांनी केला.