"...ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही", भर सभागृहात मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:16 IST2021-03-10T14:15:30+5:302021-03-10T14:16:18+5:30
Chief Minister Manoharlal Khattarwas in tears in the House : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात मुख्यमंत्री भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत.

"...ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही", भर सभागृहात मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर
चंदिगड - विरोधी पक्षांनी आणलेल्या अविस्वास प्रस्तावामुळे हरियाणामधील भाजपा-जजपा आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना आपले अश्रूही आवरता आले नाहीत. सभागृहात याबाबत बोलताना मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar ) म्हणाले की, जेव्हा मी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हु्डा यांना आंदोलनादरम्यान, एका ट्रॅक्टरवर बसलेले आमि महिला आमदारांना हे वाहन दोरीने ओढताना पाहिले तेव्हा मला खूप दु:ख झाले. खट्टर यांनी सांगितले की, टीव्हीवर हे चित्र पाहिल्यानंतर मी संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही. (... I couldn't sleep all night seeing that scene, the Chief Minister Manoharlal Khattar was in tears in the House)
मनोहरलाल खट्टर यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसच्या आंदोलनात घडलेल्या घटनेचा हवाला दिला. त्यांनी विधानसभेमध्ये सांगितले की, महिला आमदारांसोबतचे असे वर्तन वेठबिगार मजुरांपेक्षा अधिक वाईट आहे. आंदोलनादरम्यान, हुड्डा ट्रॅक्टर चालकाच्या जागेवर बसले होते आणि काँग्रेस आमदार हा ट्रॅक्टर रस्सीने ओढत होते.
महिला दिवस पर भूपेंद्र हुड्डा ने महिला विधायकों के प्रति जो संवेदनहीनता दिखाई, उससे मैं आहत हूं।#HaryanaBudgetSession2021https://t.co/leRo2OK5VPpic.twitter.com/ErM4DuSbJ1
— Manohar Lal (@mlkhattar) March 9, 2021
याबाबतचा व्हिडीओ मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री सभागृहात रडताना दिसत आहेत. त्यांनी याबाबतच्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महिला दिनी भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी महिला आमदारांबाब संवेदनहीनता दाखवली. त्यामुळे मला दु:ख झाले आहे.
दरम्यान, हुड्डा यांनी याबाबत प्रत्युत्तर देताना घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि अन्या आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे महिलांनाच अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांनी सांगितले की, सरकारने दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे काणाडोळा केला आहे.