"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 02:17 AM2020-12-05T02:17:39+5:302020-12-05T07:41:01+5:30

राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव, शरद पवार; ओबामा यांच्या मतावर नोंदवला आक्षेप

"I had differences with Sonia Gandhi, but the Congress leaders still have a sense of belonging to the Gandhi-Nehru family." | "सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना"

"सोनिया गांधींशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना"

Next

पुणे : राहुल गांधी यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचे दिसते, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राष्ट्रीय नेते म्हणून राहुल गांधी यांची ओळख, या मुद्यावर उपरोक्त टिप्पणी करताना पवार यांनी अमेरिकचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केलेल्या टिप्पणीला आक्षेप घेतला.

राहुल गांधी यांना नेता म्हणून स्वीकारण्यास देश तयार आहे का? असे माजी खासदार आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मुलाखतीदरम्यान शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले की, यासंदर्भात प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसतो. बराक ओबामा यांनी अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, शिक्षकाला प्रभावित करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत; परंतु त्यांच्यात अभियोग्यता आणि विषयात प्रावीण्य मिळविण्याच्या उत्कटतेचा अभाव आहे. याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, हे आवश्यक नाही की, आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे. काँग्रेसचे भवितव्य आणि राहुल गांधी हे पक्षासाठीचा अडथळा याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून आहे की, ते कशाला मंजुरी देतात. पवार म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी माझे मतभेद होते, तरीही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांबाबत आपुलकीची भावना आहे.  

मर्यादा ओलांडली 
आम्ही प्रत्येकाचा दृष्टिकोन स्वीकारायला हवा. आमच्या देशातील नेतृत्वाबाबत आम्ही काहीही म्हणू शकतो; पण दुसऱ्या देशातील नेतृत्वाबाबत बोलणार नाही. मला वाटते की, ओबामा यांनी ही मर्यादा ओलांडली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.  

Web Title: "I had differences with Sonia Gandhi, but the Congress leaders still have a sense of belonging to the Gandhi-Nehru family."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.