शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 10:29 PM

rahul gandhi : राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते.

मुंबई : राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. (online tribute meeting to pay homage to rajiv satav, rahul gandhi and other senior congress leaders present)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते. तसेच, आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, कोरोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास, काम करण्याची क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य होते. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकिर्दिला सुरुवात करुन आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती.

याचबरोबर, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. तर एच. के. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर उत्तम काम केले. पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. देशासाठी आणि पक्षासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. काँग्रेस विचारांशी त्यांची बांधीलकी होती. जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधानाने माझे वैयक्तिक व पक्षाची मोठी हानी झाली आहे. राजीव हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहतील.

'राजीव यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करुन देशपातळीवर आपल्या कामाचा वेगळी छाप पाडली होती. संसदेत काँग्रेस पक्षाची रणनिती ठरवण्यातही ते नेहमी आग्रही असत. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाला मोठी ताकद मिळवून दिली. काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाढलेली ताकद ही राजीव सातव यांच्या कामाचा परिपाक आहे. कोरोनाने राजीव सातव यांना आपल्यातून हिरावले ही अत्यंत दुःखद घटना आहे', असे के, सी. वेणुगोपाल म्हणाले. तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.

या ऑनलाईन श्रद्धांजली सभेत खा. राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, विरोधी पक्षनेता राज्यसभा मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील,  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेता तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आ. अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे खासदार, आमदार आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोले