सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 06:23 AM2021-03-30T06:23:32+5:302021-03-30T06:24:29+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, यात मोफत लसीकरणासह नीट व नवे शिक्षण धोरण रद्द करणे, गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये, शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणा केल्या आहेत.

If he comes to power, Congress will give one thousand rupees per month to housewives | सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

सत्ता आल्यास कांग्रेस गृहिणींना दरमहा देणार एक हजार रुपये

Next

पुदुच्चेरी : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला असून, (Puducherry Assembly Elections 2021) यात मोफत लसीकरणासह नीट व नवे शिक्षण धोरण रद्द करणे, गृहिणींना प्रतिमहिना १००० रुपये, शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणा केल्या आहेत. (If he comes to power, Congress will give one thousand rupees per month to housewives)

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी रविवारी येथे जाहीरनामा जाहीर केला. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा व्यवस्था, नवे शिक्षण धोरण रद्द करण्याचा शब्द यात देण्यात  आला आहे.  कराईकलमध्ये  कृषी विद्यापीठ व एक विधी  विद्यापीठ स्थापन करण्याचे, मागास वर्ग महामंडळ व इतर  महामंडळाच्या कर्जदारांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासनही दिले  आहे. 

Web Title: If he comes to power, Congress will give one thousand rupees per month to housewives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.