अकोला : आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक’ जाहीर केले; मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केले. त्यामुळे मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींसोबत ते बोलत होते. राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलाॅक करण्यात आले असून, तेथील सर्व व्यवहार सुरळीत होतील, पाच स्तरावर अनलाॅकची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची घोषणा मदत व मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केली. परंतू तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात अॅड आंबेडकर यांनी मत व्यक्त केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार मंत्री वडेट्टीवार यांनी ‘अनलाॅक ’जाहीर केले; मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द कले हे चुकीचे असून, आपत्ती व्यवस्थानाचे निर्णय लागू झाले पाहीजे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, ; मात्र या खेळात सामान्य माणूस भरडला जाऊ नये, असा आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळे खायची आणि भाजपवर टिका करायची, अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाहीत काॅंग्रेसनेही तेच करावे, असे सांगत एका मंत्र्याचा आदर राखला जात नसेल तर काॅंग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावे पडावे, असा सल्लादेखिल अॅड.आंबेडकर यांनी दिला.
दोघांपैकी एकाने राजीनमा द्यावा!
वडेट्टीवार यांनी अनलाॅकचा निर्णय जाहीर केला तर मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्र्याचा निर्णय बदल करुन लागू केला तर मंत्र्याचा अपमान आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाने राजीनामा दिला पाहीजे, असा सल्ला देखिल अॅड.आंबेडकर यांनी दिला.