मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेली अभिनेत्री कंगना राणौत सध्या शिवसेनेला सातत्यानं लक्ष्य करत आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असल्याची भावना कंगनानं व्यक्त केल्यानंतर शिवसेनेलादेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला थेट इशारा दिला आहे. सरनाईक यांनी थोबाड फोडण्याची भाषा केल्यानं या वादात राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री झाली. यानंतर सरनाईक यांनी दोन ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.भाजपनं राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद पुढील काही दिवस सुरूच राहणार असल्याचं दिसत आहे.
काय म्हणाले होते प्रताप सरनाईक?शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना राणौत यांच्यात जुंपली असताना प्रताप सरनाईक यांनी थेट थोबाड फोडण्याची भाषा केली. 'कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असं सरनाईक म्हणाले होते.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला उपरतीचहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर कंगनानं मुंबईबाबतच्या आपल्या भावना ट्विट करून व्यक्त केल्या. त्यात ती म्हणते की, महाराष्ट्रामधील माझ्या मित्रांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. त्यांना माझ्या बोलण्याचा रोख माहीत आहे. तसंच माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवर असलेल्या माझ्या प्रेमाचा पुरावा देण्याचीही मला गरज वाटत नाही. मुंबईनं मला नेहमीच यशोदेप्रमाणे सांभाळलं आहे. कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेने केली पोलिसात तक्रारVIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारणकंगना रणौतच्या ड्रग्स वक्तव्यावर एक्स-बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनची प्रतिक्रिया, म्हणाला - 'मी बोललो तर...'अमृता फडणवीस यांच्याकडून कंगना राणौतची पाठराखण, म्हणाल्या...