मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते सध्या आमने-सामने आलेले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भाजपा आमदारा राम कदम यांनी पोलिस आणि राज्य सरकारला दिले आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे.दरम्यान, तळोजाला निघण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की, अर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान राम कदम यांनी राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहे.
"अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा"
By बाळकृष्ण परब | Published: November 09, 2020 11:47 AM
Ram Kadam News : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे.
ठळक मुद्देअर्णब गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाहीमी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा