"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:01 PM2021-05-26T17:01:50+5:302021-05-26T17:10:51+5:30

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

india covid vaccination drive congress leader priyanka gandhi hits at modi govt over vaccine shortage | "जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 2 कोटींचा टप्पा पार केला आहे.  कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून "जबाबदार कोण?" असं म्हणत काही प्रश्न विचारले आहेत. 

"आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत" अशी परिस्थिती असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच "आज, भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

"कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे" असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. 

प्रियांका गांधी यांनी मोदींना विचारलेले तीन प्रश्न

- सरकारची गेल्या वर्षी लसीकरणाची संपूर्ण योजना तयार होती, मग जानेवारी 2021 मध्ये केवळ 1 कोटी 60 लाख लसी का मागवल्या गेल्या?

- सरकारने देशात कमी लसी देऊन परदेशात अधिक लसी का पाठवल्या?

- जगातील सर्वात मोठा लस उत्पादक भारत आज इतर देशांकडून लस मागवण्याच्या स्थितीत का आहे आणि हे सरकार उपलब्ध असल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न का करत आहे?

Web Title: india covid vaccination drive congress leader priyanka gandhi hits at modi govt over vaccine shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.