'रोजगार देण्याऐवजी ते म्हणतात, पकोडे तळा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 05:30 IST2019-04-27T05:30:08+5:302019-04-27T05:30:56+5:30
मोदी सरकारवर अजित पवारांचे टीकास्त्र

'रोजगार देण्याऐवजी ते म्हणतात, पकोडे तळा'
पुणे : केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यापासून देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, नोटाबंदी, जीएसटीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारांना नोकरी देण्याऐवजी त्यांना पकोडे तळायला लावून त्यांचा अपमान केला जात आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी लोणी काळभोर येथे शुक्रवारी आयोजित सभेत पवार यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली.