मोठी घडामोड! काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भडका?; बाळासाहेब थोरात, नितीन राऊत पोहोचले दिल्लीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:57 AM2021-07-09T11:57:27+5:302021-07-09T13:01:22+5:30
विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता.
नवी दिल्ली – विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं उघड झालं आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही काळातच नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून आतापर्यंत हे पद रिक्त आहे.
विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत चर्चा होईल मग निर्णय होईल असं राष्ट्रवादी-शिवसेना(NCP-Shivsena) म्हणत होती. तर हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. परंतु अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत संभ्रम आहे.
त्यातच आता काँग्रेस(Congress) विधानसभा अध्यक्षपदावरून पक्षात मतभेद झाल्याचं कळतंय. यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसला मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी थोरात, राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.त्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
फडणवीसांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, चौकशी अहवालानंतर गृहविभागाने राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य पदावरून हटवलं #NCP#DevendraFadnavishttps://t.co/SX6JghOlG8
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2021
नाना पटोलेंनी केली होती घोषणा
विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील असं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलं होतं. तर ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते. मात्र या विधिमंडळ अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही.