मुकेश अंबानींकडून (Mukesh Ambani) पैसे काढणे एवढे सोपे आहे का? ज्या मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत त्यां अंबानींकडे पोलीस (Mumbai Police) पैसे मागायला जातील का? गेलेच तर पोलीस खात्यात राहतील का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackreay) 100 कोटी रुपयांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावर केला आहे. (Why Mukesh Ambani get police security from Madhya pradesh police? Raj Thackreay ask question.)
दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
याचबरोबर मुकेश अंबानींना इस्त्रायलची यंत्रणा सुरक्षा पुरविते. त्यांच्या सुरक्षेसाठी इस्त्रायलची लोकं आहेत. इस्त्रायलची यंत्रणा काय आहे हे साऱ्या जगाला माहिती आहे. मुकेश अंबानींना इतर पोलीस सुरक्षा आहे ही मध्य प्रदेश सरकारची आहे. त्यांच्या ताफ्यात सहा सात रेंज रोव्हर आणि त्यात हे पोलीस बसलेले असतात. मुंबईतील माणसाला मध्य प्रदेश सुरक्षा का पुरविते हे समजलेले नाही. एखादा माणूस त्या रोडवर जरी दोनदा गेला तरी त्याची चौकशी होते. त्या रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी कशी गेली? धमकी देणारा माणूस आदराने पत्र पाठवतो. गुड नाईटचे स्पेलिंग एनआयटी असे आहे. या पत्राचा टोन गुजराती आहे. त्या अंबानींकडून पत्र काढणे सोपे आहे का? असा सवाल करत राज ठाकरेंनी हे प्रकरण भरकटवले जात असल्याचा आरोप केला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Raj Thackeray Demands Central Government to inquire in the mukesh ambani bomb scare case and allegations on Anil Deshmukh)
Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे
परमबीर सिंग यांची बदली नेमकी कशासाठी?"बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणात जर सचिन वाझेचा हात होता. मग मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली का केली गेली? आणि जर परमबीर सिंगही यात सामील असतील मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली गेली? या प्रश्नाचं उत्तर सरकारनं द्यावं. कारण परमबीर सिंग यांच्या बदलीचं नेमकं कारणंच सरकारनं दिलेलं नाही", असं राज ठाकरे म्हणाले.
मुंबईचं १०० कोटींचं टार्गेट मग इतर शहरांचं काय?राज्याचा गृहमंत्री मुंबईसारख्या शहराच्या पोलीस आयुक्तांना वसुलीचं टार्गेट देतो हा अतिशय घाणेरडा प्रकार असून मुंबईसाठी जर देशमुखांनी १०० कोटींचं टार्गेट दिलं होतं तर इतर शहरांमध्ये काय परिस्थिती असेल?, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. यासोबत परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त होऊन वर्षभराचा कालावधी झाला आहे. जर महिन्याला १०० कोटी पकडले तर वर्षाचे १२०० कोटी रुपये जमा झाल्याचं आपण समजायचं का? इतका पैसा गेला कुठे?, असे सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.