शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

"हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री?" अनिल परब यांच्यावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 2:46 PM

Maharashtra Politics News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाची कोंडी केली.

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाची कोंडी केली. दरम्यान, काल विधानसभेत झालेल्या चर्चेत भाजपा आमदार नीतेश राणे यांनी ठाकरे सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली. यावेळी नीतेश राणे (Nitesh )  यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  (It is the Transport Minister or the Family Minister, Nitesh Rane Criticize Anil Parab)

सभागृहात राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना नीतेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. त्यांनी कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला. 

अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. पण हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देतंय. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय, असा सवालही नीतेश राणे यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबNilesh Raneनिलेश राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा