मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावलं असून पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचं समजतं. या प्रकरणी संजय राऊत आज दुपारी दोन वाजता शिवसेवा भवनात पत्रकार परिषदेत घेणार आहेत.ED च्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, गाण्यातून व्यक्त केली भावनाथोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकारांशी थोडक्यात संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला. 'मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही.. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,' असा टोला त्यांनी लगावला. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याचंदेखील ते पुढे म्हणाले.संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरणईडीची नोटीस अन् राऊतांकडून गाण्याच्या ओळी ट्विटशिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता ईडीने राऊत यांच्याकडे मोर्चा वळवल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राऊत यांनी ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.राऊतांची बॅटिंग सुरू असताना 'यूपीए अध्यक्ष' पदावरून शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह; म्हणाले... महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात राऊतांची महत्त्वाची भूमिका विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थापनेसाठी वातावरण निर्मिती करण्यामध्ये संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर, गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उठवली आहे.ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण'
By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 10:27 AM