शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अण्णा हजारेंनी केलेल्या त्या टीकेला जयंत पाटील यांनी दिलं अस उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 11:21 AM

Jayant Patil News : अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी टीका केली होती.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अण्णांच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळलेअण्णांच्या टीकेवर काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल दिली महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील

सावंतवाडी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाविकास आघाडी सरकार वर केलेल्या टिकेवर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर देण्याचे टाळत काय बोलायचे असा सवाल केला व हसतच प्रश्नाला बगल  दिली. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील असा विश्वास ही व्यक्त केला.मंत्री जयंत पाटील हे रविवारी सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आले असता रात्री उशिरा सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,काका कुडाळकर,अबिद नाईक,पुंडलिक दळवी,रेवती राणे,प्रफुल्ल सुद्रिक आदि उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कोणताही अन्याय केलेला नाही,अशा प्रकारे कोणीही मंत्री कोणाचे नुकसान करत नाही.त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी कोण टीका करत असेल,तर आम्ही काय बोलणार,असा सवाल  मंत्री पाटील यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता उपस्थित केला. दरम्यान सिंधुदुर्गातील अवैद्य धंदे रोखण्यासाठी दिवाळीनंतर एक्साईज आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून जॉईंट ऑपरेशन राबविण्यात येईल.तर गरज असल्यास कायद्यात कठोरता आणली जाईल असे सांगितले.  आगामी काळात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाणार आहे.येणाऱ्या सर्व पुढील निवडणुका एकत्र येवूनच लढवू,असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीला राज्यपाल मंजूरी देतील आता पर्यंत राज्यपालांनी कधीही अशी यादी नाकारली नसल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते अण्णा हजारे 

 महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली  होती. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला होता. एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारेंनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलanna hazareअण्णा हजारेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस