"रक्ताने माखलेल्या हातांनी ममतांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली"; भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:56 AM2021-05-06T10:56:05+5:302021-05-06T11:05:37+5:30
BJP JP Nadda Slams Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार उफाळून आला आहे. यावरून नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली. निवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात 14 जणांचा मृत्यू झाला. भाजपा व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. याच दरम्यान भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP JP Nadda) यांनी ममता बॅनर्जींवर घणाघाती आरोप केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार उफाळून आला आहे. यावरून नड्डा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जे. पी. नड्डा यांनी "पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारे नरसंहार सुरू आहे आणि निर्घृण हत्या होत आहेत, यावरून 36 तास मौन बाळगून या रक्तपातात आपणही सामील असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं आहे. ममतांचं मौन हे सर्व काही बोलत आहे आणि याच रक्ताने माखलेल्या हातांनी ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत" असं म्हटलं आहे. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार आणि हत्यांचा तीव्र निषेध आहे. आम्ही बंगालच्या जनतेच्या पाठिशी उभे आहोत. ज्या ठिकाणी या हिंसक घटना आणि हत्या घडल्या आहेत तेथील नागरिकांसोबत आहोत असं देखील म्हटलं आहे.
"अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत", ममता बॅनर्जी कडाडल्या#WestBengalViolence#WestBengal#WestBengalElections2021#MamataBanarjee#BJP#TMChttps://t.co/7OOXzCz5kVpic.twitter.com/qUNw6CcEye
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
"पश्चिम बंगालमधील या रक्तपाताने भारत-पाकिस्तान फाळणीची आठवण करून दिली. फाळणीचा तो दिवस आज आपल्याला आठवतोय. कारण तशीच स्थिती 2 मे रोजी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली. 2 मे चा दिवसा 'खेला होबे'चा असेल, असं ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणाल्या होत्या. आता तेच घडतंय" अशा शब्दांत नड्डा यांनी निशाणा साधला आहे. निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या हिंसाचारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाष्य केलं आहे. ममता य़ांनी भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. "जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"जुने व्हिडीओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करतेय", ममता बॅनर्जी कडाडल्या
बंगाल ही एकता असलेली भूमी आहे असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. जिथे भाजपा जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भाजपा आता जुने व्हिडीओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्या असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
"दीदींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले कुरूप नृत्य थांबवायलाचं हवं"#WestBengalViolence#WestBengal#WestBengalElections2021#MamataBanarjee#BJP#Assamhttps://t.co/JKMKsnffo4pic.twitter.com/YKtsBURwHW
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
"बंगालमधील हिंसाचारापासून बचाव करण्यासाठी 400 कार्यकर्ते आसाममध्ये आले", भाजपा नेत्याचा दावा
विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या हिंसाचारापासून आपला बचाव करण्यासाठी बंगालमधील भाजपाचे सुमारे 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसाममध्ये आले आहेत असा दावा भाजपाच्या नेत्याने केला आहे. आसामचे मंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी 300 ते 400 कार्यकर्ते हिंसाचारानंतर आसाममध्ये आल्याचं म्हटलं आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून काही फोटो शेअर केले आहेत. "भाजपा बंगालचे 300 ते 400 कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय छळ आणि हिंसाचाराचा सामना केल्यावर आसाममधील धुबरी येथे निघून आले आहेत. आम्ही त्यांना निवारा आणि अन्न देत आहोत. दीदींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेले कुरूप नृत्य थांबवायलाचं हवं! बंगाल यापेक्षा अधिक चांगल्यासाठी पात्र आहे" अशा शब्दात हेमंत बिस्वा शर्मा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
West Bengal Election Result 2021: "पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता"#AssemblyElections2021#AssemblyElectionResults#WestBengalElections2021#westbengalassemblyelection2021#MamataBanerjee#BJP#AkhileshYadav
— Lokmat (@MiLOKMAT) May 2, 2021
https://t.co/gZDTJ4wK3tpic.twitter.com/tYtc9n2uR6