शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मोदी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधणार! ज्योतिरादित्य शिंदेंसह तिघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 5:29 AM

Jyotiraditya scindia News : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. अन्यथा मागच्या महिन्यातच विस्तार झाला असता, असे सूत्रांनी सांगितले.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे, सुशील मोदी, वरुण गांधी, मुकुल रॉय यांच्याबरोबरच आणखी दोघांना संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच नव्या मुस्लिम चेहऱ्यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे समजते.

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुका गेल्या महिन्यात पार पडल्या. आता नव्या वर्षात मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. अन्यथा मागच्या महिन्यातच विस्तार झाला असता, असे सूत्रांनी सांगितले.सद्य:स्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह २२ मंत्री आणि ३२ राज्यमंत्री आहेत. त्यात स्वतंत्र जबाबदारी असलेल्या राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शिवसेना आणि अकाली दल यांनी भाजपप्रणीत रालोआला सोडचिठ्ठी दिल्याने अनुक्रमे अरविंद सावंत आणि हरसिमरत बादल यांच्या खात्यांचा अतिरिक्त कारभार इतरांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी या मंत्र्यांच्या निधनामुळे त्या जागाही रिक्त आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांकडे तीन ते चार खात्यांची अतिरिक्त जबाबदारी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे समजते. विद्यमान मंत्र्यांपैकी दोघांना पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असाही मतप्रवाह आहे.दरम्यान, मकरसंक्रांतीचा मुहूर्त हुकल्यास पंतप्रधान मोदी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मार्च वा एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, अशी शक्यताही सूत्रांनी बोलून दाखवली आहे.ज्योतिरादित्य शिंदे यांना नववर्षाची भेटमध्य प्रदेशात बंडखोरी करून भाजपला बळ देणारे ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नववर्षाची भेट दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्योतिरादित्य यांनी लोधी इस्टेटमध्ये त्यांना देऊ करण्यात आलेल्या बंगल्या न जाता आनंद लोकमधील भाडेतत्त्वावरील घरात राहणे तूर्तास पसंत केले आहे.मुस्लिम चेहऱ्याला संधीमोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ धोरणाला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणखी एका मुस्लिम चेहऱ्याला मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीVarun Gandhiवरूण गांधी