शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

'कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; योगी आदित्यनाथांवर मनसेचे 'ठग'वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 8:48 AM

yogi adityanath mumbai visit : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली.

मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (yogi adityanath mumbai visit)  आले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनंतर आता मनसेनेही जोरदार टीका केली आहे. मनसेने आदित्यनाथ उतरलेल्या हॉटेलसमोरच पोस्टर लावत ठग असे संबोधल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली. तसेच हिंदीच नाही तर मराठी सिनेमेदेखील बनविणार असल्याचे तिथल्या अध्यक्षाने जाहीर केले होते. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत आल्या आल्या अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली. तसेच ते इतर दिग्दर्शक, अभिनेत्यांचीही भेट घेणार आहेत. यावर मनसेने निशाना साधला आहे. ''कहा राजा भोज...और कहा गंगू तेली..'; कुठे महाराष्ट्राचे वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र्य, अशा शब्दांत टीका केली आहे. तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी युपीला नेण्याचं मुंगेरीलालचे स्वप्न असे हिणवत ''अपयशी राज्यातील बेरोजगारी लपविण्यासाठी मुंबईतील उद्योग पळविण्यासाठी आलेला 'ठग', असा पोस्टर मनसेने लावला आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये उतरले आहेत. 

मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अयोजित कार्यक्रमात,  ‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला. मॅग्नेटिक या शब्दात मोठी ताकद आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे. हे सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. राज्यात नवीन गुंतवणूक येते आहे. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्या सोबत असते हे तुम्हाला सांगता येईल, असे ते म्हणाले.

योगींच्या भेटीवर भाजप नेत्यांचे मौन का?उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  महाराष्ट्रात येऊन  इथले उद्योग तिकडे नेण्याची भाषा करतात, तरीही भाजप नेते गप्प का, असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलीवूडने उत्तर प्रदेशात यावे असे आवाहन केले. त्यावर चव्हाण म्हणाले, भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. त्यावेळीही राज्यातील भाजप नेते गप्प बसले. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMNSमनसेMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेशbollywoodबॉलिवूड