मुंबई : मंदिरे खुली करण्याच्या मागणीनंतर आता भाजपने रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तशी मागणी केली असून दुसरे भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
'राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी,' असे भातखळकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी किमान बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व लक्षात ठेवावे. बाळासाहेब आज असते, तर त्यांनी सर्वप्रथम मंदिरं खुली केली असती आणि त्यानंतर बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल उघडली असती, असं भातखळकर म्हणाले. रामलीला आयोजनासाठी परवानगी मागणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आहे. 'गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत.
आजही ती मंडळी मते मागण्यासाठी तेच राजकारण करत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मात्र तरीही अशा मागण्या केल्या जात आहेत. कोरोना संकट संपताच मुख्यमंत्री स्वत: सगळी धार्मिकस्थळं सुरू करतील, असं सरनाईक म्हणाले.