शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

राहुल गांधीविरोधातलं 'ते' आक्रमक ट्विट सिब्बल यांच्याकडून काही मिनिटांत डिलीट; सारवासारव करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 2:36 PM

राहुल गांधीना अतिशय आक्रमक भाषेत प्रत्युत्तर देणारं ट्विट अखेर सिब्बल यांच्याकडून डिलीट

नवी दिल्ली: देशातील काँग्रेसच्या २३ बड्या नेत्यांनी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावरून वातावरण तापलं आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत या पत्रावरून घमासान सुरू आहे. राहुल गांधींना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. मात्र काही वेळातच त्यांनी ट्विट मागे घेतलं. राहुल गांधी माझ्याशी थेट बोलले. त्यामुळे मी माझं ट्विट डिलीट करत असल्याचं सिब्बल यांनी स्पष्ट केलं. पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र सोनिया गांधींना लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही भाजपाशी संगनमत केलंय, असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,' अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी व्यक्त केली. राहुल गांधींचं नाव घेऊन अतिशय आक्रमकपणे टीका करणाऱ्या सिब्बल यांनी काही मिनिटांनंतर ट्विट डिलीट केलं. त्यांनी दुसरं ट्विट करून याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. 'राहुल गांधी थेट माझ्याशी बोलले. माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं विधान आपण केलंच नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे,' असं सिब्बल यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं. तत्पूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सिब्बल यांच्या ट्विटला उत्तर दिलं होतं. 'राहुल गांधी तसं काहीही म्हणालेले नाहीत. यासंदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही. कृपया माध्यमांमधल्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आपण आपापसात लढण्याऐवजी मोदी सरकारविरोधात लढणं गरजेचं आहे,' असं सुरजेवालांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर सिब्बल यांनी राहुल यांच्यावर टीका करणारं ट्विट मागे घेतलं.सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, AICC आणि CWC चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्‍पा मोइली, पृथ्‍वीराज चव्‍हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्‍बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्‍त्री आणि संदीप दीक्षित.कपिल सिब्बल राहुल गांधींवर भडकले; कडक शब्दांत ट्वीट करत सुनावलेमला 'रिलीव्ह' करा, नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा; सोनिया गांधींच्या काँग्रेस कार्यकारिणीला सूचनासोनिया गांधी पायउतार झाल्यानंतर पुढे काय?; अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा प्लान तयार

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस