ठळक मुद्देविदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागांत पावसामुळे उडालेल्या हाहा:काराकडे, उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्षत्यामुळे मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहेमुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांचा ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा
मुंबई - काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.मुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागांत पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहा:काराकडे, उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक भागांत साचले पाणीमुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलेच झोडपले आहे. मंगळवारी सायंकाळपासून तुफान पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी भरले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.मुंबईत मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मालाड, अंधेरी, खार या भागांतही पाणी साचले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. याबाबत मुंबई पालिकेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंताआधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी