- पोपट पवारतिरुवनंतपुरम : अंतर्गत वाद, गटबाजीने आधीच पोखरलेल्या केरळ काँग्रेसमध्ये आता शीर्षस्थानी असलेल्या नेत्यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू केल्याने त्यांच्यात समन्वय राखण्याचे माेठे आव्हान हायकमांडसमोर उभे ठाकले आहे.काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी छुपी दावेदारी करणाऱ्या ओमेन चंडी, विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला आणि खासदार मुरलीधरन या तीन नेत्यांच्या एकजुटीसाठी पक्षाचे नेते राहुल गांधी यांना कसरत करावी लागत आहे. प्रचार सभा आणि रोड शोमध्ये या तिन्ही नेत्यांच्या मतदारसंघात समान वेळ देऊन त्यांच्यात एकवाक्यता राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसमध्ये गळती लागल्याने डाव्या पक्षांच्या तुलनेत काँग्रेस प्रचारात काहीशी मागे राहिल्याचे चित्र होते. त्यातच माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी स्वत:हून प्रचारात उतरत कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली. एकीकडे कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी करू लागल्याने पक्षनेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. ७६ वर्षे वयाचे ओमेन चंडी हे काँग्रेसचे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून ओखळले जातात. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या मर्जीतील म्हणूनही त्यांची ओळख आहे. दुसरीकडे डाव्या पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढणारे विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांच्याही मनाने या पदासाठी उचल खाल्ली आहे. सोनेतस्करी प्रकरणात डाव्यांना पुरते नामोहरम करून काँग्रेसला उभारी देण्यात चेन्निथला यांचा मोठा वाटा राहिला आहे.
मुरलीधरनही स्पर्धेत राज्यात पुन्हा सक्रियn भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नेमम या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून रिंगणात उतरलेलेमुरलीधरनही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.n माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे सुपुत्र असलेले मुरलीधरन हे लोकसभेचे खासदार आहेत. चंडी आणि चेन्निथला यांनीच दोघांत तिसरा नकोचा डाव टाकत मुरलीधरन यांना दिल्लीला पाठविले होते. n मात्र, विधानसभा निवडणुकीत मुरलीधरन यांनी परत राज्यात येत आपले स्थान मजबूत केले आहे. n भाजपच्या बालेकिल्ल्यातच त्यांनी उमेदवारी करत त्यांना आव्हान दिल्याने पक्षामध्येही त्यांची प्रतिमा उंचावली आहे.