शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

Kerala Assembly Elections 2021 : सीएएचा मुद्दा केरळ निवडणुकीत ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:16 AM

Kerala Assembly Elections 2021 : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार नसल्याचे सांगितले.

पुतली : केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजप पुरस्कृत एनडीएने आपले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले, तर डाव्या आघाडीने (एलडीएफ) हा कायदा कोणत्याही स्थितीत लागू करणार नसल्याचे सांगितले.केरळमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला डाव्या पक्षांनी व काँग्रेसने विरोध करीत मोर्चे काढले होते. त्याचवेळी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. हा कायदा भेदभाव करणारा आणि मुस्लीमविरोधी असल्याचे त्यावेळी म्हटले होते.संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या पक्षाने दिलेले वचन पूर्ण केल्याचे सांगितले. कोट्टयम जिल्ह्यातील पुथुपुल्ली मतदारसंघात प्रचारादरम्यान ते म्हणाले, काश्मीरमधून ३७० कलम रद्द करणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, मुस्लीम महिलांसाठी तीन तलाक रद्द करण्याचे वचन त्यांनी पूर्ण केले आहे.कोळीकोड जिल्ह्यातील पुरामेरी मतदारसंघात प्रचारादम्यान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नाही. उत्तर भारतात अल्पसंख्याकांविरुद्धच्या काही घटनांबद्दल संघ परिवाराविरुद्ध त्यांनी टीका केली. मुस्लीम आणि ख्रिश्चनांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोपही विजयन यांनी केला. केरळ निवडणुकीत चित्रपट कलाकारांना उमेदवारीतिरुवनंतपुरम : इतर राज्यांप्रमाणेच केरळमध्येही चित्रपट आणि टीव्ही कलाकारांचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर असल्याचे सुरू असलेल्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना तिकिटे दिली आहेत. यावेळी नऊ कलाकारांना विविध राजकीय पक्षांनी निवडणूक रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते आणि राज्यसभेचे सदस्य सुरेश गोपी यांना भाजपने त्रिशूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. डाव्या आघाडीने विद्यमान आमदार बी. गणेश कुमार यांना पठाणपूरम मधून तर मुकेश यांना कोल्लम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पाला विधानसभा मतदारसंघातून आमदार एम. सी. कप्पन यांनी डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सोडून ते काँग्रेसप्रणीत यूडीएफकडे गेले आहेत. या जागेवरून ते पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांना काँग्रेस एम. पक्षाचे उमेदवार जोसेफ के. यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली आहे. ते मणी पक्षाचे उमेदवार आहेत.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021