Assembly Elections 2021 : पक्षाने तिकीट नाही दिले, काँग्रेसच्या महिला अध्यक्षाने भर चौकात मुंडण केले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:01 PM2021-03-14T20:01:10+5:302021-03-14T20:02:52+5:30
Assembly Elections 2021 :
तिरुवनंतपुरम - सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. केरळमध्येही वातावरणात राजकीय रंग भरले आहेत. (Kerala Assembly Elections 2021) येथे मुख्य लढत सत्ताधारी डावी आघाडी(एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी (यूडीएफ) यांच्यात आहे. वायनाड येथून विजय मिळवून लोकसभेत पोहोचल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केरळमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असले तरी केरळमध्ये तिकीटवाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. ( The party did not give the ticket, the Congress woman president shaved her head in Thiruvananthapuram )
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ महिल्या नेत्याने भर चौकात मुंडण केल्याची घटना घडली आहे. केरळ महिला काँग्रेसच्या प्रमुख लतिका सुभाष यांनी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न दिल्याने तिरुवनंतपुरममधील पक्षकार्यालयासमोर मुंडण केले.
Kerala Mahila Congress chief Lathika Subhash gets her head tonsured in front of the party office in Thiruvananthapuram in protest after being denied the party ticket for Assembly elections.
— ANI (@ANI) March 14, 2021
"I am not joining any party but I'll resign from my post," she says. pic.twitter.com/FWme31IEdU
यावेळी लतिका सुभाष यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने उघड नाराजी व्यक्त केली. तसेच पदाचा राजीनामाही दिला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, मी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करत नाही आहे. मात्र मी पक्षातील माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदार होणार आहे. येथे बहुमताचा आकडा ७१ असून, राज्यातील सत्तेसाठी डावी आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये चुरस आहे. २ मे रोजी केरळमधील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.