नवी दिल्ली : देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. माकपाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाहीवादी आघाडी यांच्यात पूर्वापार या राज्यामध्ये लढत होत आहे. यंदा मात्र भाजपनेही येथे ताकद लावलेली आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या तिरंगी लढती रंगतदार ठरणाºया आहेत.मागील निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला आठ तर माकपाला पाच, भाकप आणि आरएसपीला प्रत्येकी एक तर मुस्लीम लीगला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कॉँग्रेसला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल माकपाला २२, भाजपा १० तर भाकपला ८ टक्के मते मिळाली होती. अपक्षांनाही १२ टक्के मतांचा लाभ होऊन दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. मुस्लीम लीगने ५ टक्के मते घेतली. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर कमी (२३.७० टक्के) झाली. याचा फायदा माकपाला होऊन त्यांची मते वाढली तसेच राज्यात डाव्या आघाडीचे सरकारही आले. या निवडणुकीमध्ये माकपा (२६.५५ टक्के), भाजपा (१०.५३ टक्के), भाकप (८.१२ टक्के) तर मुस्लीम लीग (७.४० टक्के) मते मिळाली होती. शबरीमाला, महापुराची पार्श्वभूमी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणाचा राजकीय लाभ मिळविण्याचा सर्व पक्षाचा प्रयत्न आहे. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराने झालेले नुकसान हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे होते.यंदा वेगळे काय?माकपा व भाकपची डावी आघाडी आहे. कॉँग्रेस आणि मुस्लीम लीगची संयुक्त लोकशाहीवादी आघाडी झाली आहे. मागील निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप,बीडीजेएस आणि टीएलकेसी या पक्षांनी आघाडी केली आहे. भाजप प्रथमच येथून लोकसभेमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहे.काँग्रेसची प्रतिष्ठा पणालावायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूरही रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूवरून विरोधक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत. मतदारांचा कौल मात्र २३ मे रोजीच कळेल
केरळ: चर्चा वायनाडची, पण तिरंगी लढतींमध्ये आघाड्यांचा लागेल कस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:36 AM