Kerala Assembly Election Result 2021 Highlights: काँग्रेसची पिछेहाट, डावे सुस्साट, सुरुवातीच्या कलांमध्ये बहुमत; केरळमध्ये इतिहास घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:41 AM2021-05-02T09:41:46+5:302021-05-02T09:42:29+5:30
Kerala Assembly Election Result 2021 Highlights: केरळमध्ये डावे सत्ता राखण्याची शक्यता; १४० पैकी ८० हून अधिक जागांवर आघाडी
Kerala Assembly Election Result 2021 Highlights- थिरुअनंतपुरम: काँग्रेस आणि डाव्यांना आलटून पालटून संधी देणाऱ्या केरळमध्ये यंदा इतिहास घडण्याची शक्यता आहे. डाव्यांच्या नेतृत्त्वाखाली एलडीएफ सत्ता कायम राखेल, असे कल हाती आले आहेत. विधानसभेच्या एकूण १४० जागा असलेल्या केरळमध्ये सध्या डाव्यांनी ८१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफनं ५१ जागांवर मुसंडी मारली आहे. दोनच दिवसांपूर्वी आलेल्या एक्झिट पोल्सनी डाव्यांना बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे.
केरळमधील निवडणूक डाव्यांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. पश्चिम बंगाल, त्रिपुरा या डाव्यांच्या बालेकिल्ल्यांना तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं धक्का दिला. २०१८ मध्ये भाजपनं त्रिपुराची सत्ता मिळवली. तर २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आहेत. त्यामुळे आता केरळ हाच डाव्यांचा एकमेव बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन सध्या तरी बालेकिल्ला राखताना दिसत आहेत.
केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि माकपप्रणित एलडीएफ यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र या राज्यात भाजपनंदेखील मोठी ताकद लावली होती. मात्र सध्या तरी त्यांना इथे यश मिळताना दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन कोन्नी आणि मांजेश्वर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पिछाडीवर आहेत. तर निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेले मेट्रोमॅन पलक्कड विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत.
निवडणुकीचे प्रमुख प्रश्न कोणते?
भ्रष्टाचार: एलडीएफने वादळ, पूर, निपा विषाणू, कोविड या सर्व प्रकारच्या संकटांचा सामना केला आहे. परंतु निवडणुकीत सोन्याच्या तस्करीसारख्या बाबींशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शबरीमाला हा मोठा मुद्दा आहे. विशेषत: मध्य आणि दक्षिण केरळमध्ये.