शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Pre-Poll Survey 2021: राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही तर 'या' राज्याची इच्छा; सर्व्हेत मोदींना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 8:48 AM

Kerala Pre Poll survey: ५५ टक्क्यांहून अधिक लोकांची राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती; मोदींना जवळपास ३२ टक्के लोकांची पसंती

नवी दिल्ली: देशात लवकरच पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी, विरोधकांनी कंबर कसली आहे. मतदान होण्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडेदेखील समोर आले होते. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अध्यक्षा आणि विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्ता राखताना दिसत आहेत. तर आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊ शकतं.पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामावर बहुतांश राज्यांतील जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. मात्र टाईम्स नाऊ आणि सी-व्होटरनं केरळमध्ये केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना मागे टाकलं आहे. पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न सर्वेक्षणात सहभागी झालेल्या केरळमधील रहिवाशांना विचारण्यात आला. त्यावर ५५.८४ टक्के लोकांनी राहुल गांधी असं उत्तर दिलं. तर नरेंद्र मोदींच्या नावाला पसंती देणाऱ्यांचं प्रमाण ३१.९५ टक्के इतकं होतं.केरळमध्ये डावे, आसामात भाजपा, तर बंगालमध्ये असा असेल मतदारांचा कलकेरळमध्ये अब की बार, कोणाचं सरकार?केरळमध्ये डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत असतात. यंदा मात्र केरळमध्ये सत्तेत असलेले डावे पुन्हा सरकार स्थापन करतील, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटर यांनी सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे. केरळमध्ये विधानसभेचे एकूण १४० मतदारसंघ आहेत. यापैकी ८२ जागांवर लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) विजयी होईल. तर काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) ५६ जागा मिळू शकतात. राज्यात भाजपला केवळ १ जागा मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.सत्तापालट नाहीच; यूडीएफला ६० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाजटाईम्स नाऊ-सी व्होटरनं केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात एलडीएफ सत्ता राखेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एलडीएफला ७८ ते ८६ जागा मिळू शकतात. केरळमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ७१ आमदारांचा पाठिंबा आहे. सध्या विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसप्रणित यूडीएफला विरोधी बाकांवरच बसावं लागण्याची शक्यता आहे. त्यांना ५२ ते ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपला ० ते २ आणि इतरांना ० ते २ जागांवर समाधान मानावं लागू शकतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा