केरळमध्ये उच्चांकी ७७.६८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:44 AM2019-04-25T03:44:24+5:302019-04-25T03:44:52+5:30
केरळ मध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले.
तिरुवनंतपूरम : केरळमध्ये गेल्या ३० वर्षांमधील उच्चांकी ७७.६८ टक्के इतके मतदान झाले. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी माकर््सवादी कम्यूनिस्ट पक्ष प्रणित ‘लेफ्ट डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (एलडीएफ) आणि कॉँग्रेस प्रणित ‘यूनायटेड डेमॉक्रॅटीक फ्रंट’ (यूडीएफ)यांच्यात मोठी चुरस होती. २ कोटी ६१ लाख मतदारांनी मतदान केले. २४ हजार ९७० मतदान केंद्रांमध्ये मंगळवारी झालेल्या भरघोस मतदानानंतर मतदानाची टक्केवारी ७७.६८ टक्के झाल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी जाहीर केले.
कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उमेदवारीनंतर वायनाड मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. येथे उच्चांकी, ८०.३१ टक्के मतदान झाले. अनेक दशकांपासून व्दिध्रुवीय निवडणुकांसाठी प्रसिध्द असलेल्या केरळमध्ये यंदाही ‘एलडीएफ’आणि ‘यूडीएफ’मध्ये ‘करो या मरो’ लढाई झाली. भाजप प्रणित ‘नॅशनल डेमॉक्रॅटीक अलायन्स’ ने तिरुवनंतपूरम, त्रिस्सूर आणि पट्टणमथिट्टा या मतदारसंघांमध्ये
या दोन पारंपरिक पक्षांना चांगली
झुंज दिली. (वृत्तसंस्था)