मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांसारख्या विषयांवरून भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे इंधनदरवाढ, महागाई, कोरोना लसीकरण यावरून काँग्रेस केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. त्यातच मुंबईमध्येकाँग्रेस इंधनरदवाढीविरोधात आंदोलन करत बैलगाडी आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी अपघात होऊन बैलगाडीवरील काँग्रेस नेते खाली कोसळले. यावरून आता भाजपने खोचक टोला लगावला असून, तोळ सांभाळा, असे म्हटले आहे. (keshav upadhye criticize congress over leaders collapses from bullock cart while protesting)
इंधनदरवाढ, महागाई या मुद्द्यांवरून काँग्रेसची राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या निषेधार्थ मोर्चे, आंदोलनांचे आयोजन काँग्रेसकडून केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच खाली कोसळले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
तसे राज्याच्या राजकारणातही होईल
तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे.
“भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता कॅबिनेट मंत्री बनवले”
काँग्रेस नेते कोसळले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईविरोधात जनआंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि अन्य नेते बैलगाडीवरून आंदोलनात सहभागी झाले होते. बैलगाडीवर जास्त नेते झाल्यानं ती कोसळली आणि भाई जगताप यांच्यासह सगळे नेते खाली कोसळले.
“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे बैलगाडीवरील एक कार्यकर्ता हातात सिलिंडर घेऊन घोषणाबाजी करत होता. तितक्यात बैलगाडी कोसळली. त्यामुळे कार्यकर्ता सिलिंडर घेऊन जमिनीवर पडला. सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.