“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:57 PM2021-07-27T13:57:27+5:302021-07-27T14:00:01+5:30
कोकणातील पुरपरिस्थिती संदर्भात राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधींच्या दांडीवरून भाजपचा निशाणा
मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (keshav upadhye criticize maha vikas aghadi over flood situation in maharashtra and aid to victims)
महाड येथील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही या भागाला भेट देऊन पाहणी केली. मात्र, यावेळी सर्वपक्षीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”
मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच मुख्य मुद्दा
राज्यपालांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार, लोकप्रतिनिधींना आपल्या दौऱ्यावेळी बोलावले होते. पूरग्रस्तांसाठीचा हा दौरा होता. जास्तीत जास्त मदत करता आली पाहिजे. केंद्राकडून मदत कशी मिळवता येईल, यासाठी दौऱ्यावर येत राज्यपालांनी चांगली भूमिका घेतली होती. कॅाग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, भाजपच्या वतीने केवळ आशिष शेलार उपस्थित राहिले. अन्य पक्षांचे नेते का आले नाहीत, हा त्यांचा विषय आहे. मात्र, त्यावरून राजकारण करायचे. राज्यपालांवर टीका करायची हे ढोंगीपणाचे आहे. पूरासारख्या अत्यंत गंभीर विषयात राजकारण न करता शक्य ती मदत केली पाहिजे. मात्र, अशा पद्धतीने चेष्टा करणे हा पूरग्रस्तांच्या वेदनांवर डागण्या देण्याचा प्रकार सुरू आहे, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”
अन्य राजकीय पक्षांनी स्वागत करायला हवे होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक मदत केली पाहिजे. आणि मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भूमिका घेऊन पूरग्रस्तांचे दुःख पुसायला पाहणी दौऱ्यावर जात असतील, तर अन्य राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत करायला हवे होते. मात्र, बोलावून सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते तेथे गेलेच नाही. का गेले नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु, यावर राजकारण करता कामा नये, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
दरम्यान, केंद्राकडून मदत हवी आहे आणि त्यावरून राजकारणही करायचे आहे. यासाठीच अन्य कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी तिकडे फिरकले नाहीत. यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्यात यांना फारशी गरज वाटत नाही. तसेच हे किती संवेदनशील आहेत हे यावरून कळतेय, अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.