'खेला होबे' लिहिणाऱ्याचाच झाला 'खेळ'; तृणमूल काँग्रेसनं देबांगशु यांना नाकारलं तिकिट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:01 PM2021-03-05T18:01:39+5:302021-03-05T18:03:36+5:30
West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जी यांनी सादर केली २९१ उमेदवारांची यादी
येत्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी 'खेला होबे' ही सर्वात मोठी घोषणाबाजी ठरली होती. एकीकडे भारतीय जनता पक्षानं याला हिंसा आणि भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असली तरी अनेकांकडून प्रत्येक भाषणात याचा वापर केला जातो. हे इंटरनेटवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
इतकंच काय तर याचं डिजे व्हर्जन आता लग्नसमारंभातही वाजू लागलं आहे. परंतु 'खेला होबे' ही लिहिणाऱे युवा नेते आणि पक्षाचे प्रवक्ते देबांगशु यांना पक्षानं मात्र तिकिट नाकारलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २९१ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये देबांगशु यांचं नावच नव्हतं.
अनेक तरूणांमध्ये लोकप्रिय झालेलं खेला होबे हे गाणं २५ वर्षाच्या सिव्हिल इंजिनिअर आणि तृणमूल काँग्रेसचे युवा नेते देबांगशु भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे. स्वत: ममता बॅनर्जी यांनी याचा वापर सुरू केल्यानंतर भाजपच्याही अनेक बड्या नेत्यांनी त्यांना यातच उत्तर दिलं. दरम्यान, देबांगशु यांना हावडामधून तिकिट मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, देबांगशु हे ममता बॅनर्जींचे समर्थक म्हटले जातात. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी २९१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये तरूण, अल्पसंख्यांक, महिला आणि मागासवर्गातील अनेकांना संधी देण्यात आली आहे.
My dear friend, The game is ON! #KhelaHobepic.twitter.com/TmzsWDedk9
— Debangshu Bhattacharya Dev (@ItsYourDev) March 2, 2021
तरूणांना संधी
"आम्ही यावेळी अधिक तरूण आमि महिला उमेदवारांना संधी दिली आहे. याव्यतिरिक्त २३ ते २४ विद्यमान आमदारांना यावेळी तिकिट देण्यात आलेलं नाही. या यादीत आम्ही जवळपास ५० महिला, ४२ मुस्लीमस ७९ एससी आणि १७ एसटी प्रवर्गातील उमेदवारांना संधी दिली आहे," अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली.