“रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा”; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:12 PM2021-07-02T17:12:54+5:302021-07-02T17:16:27+5:30

आता रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

kirit somaiya demand ed to investigate acquisition of kannad sahakari sakhar karkhana of rohit pawar | “रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा”; भाजपची मागणी

“रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा”; भाजपची मागणी

googlenewsNext

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त करण्यात आला आहे. यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता रोहित पवारांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीची चौकरी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. (kirit somaiya demand ed to investigate acquisition of kannad sahakari sakhar karkhana of rohit pawar)

“नव्या पिढीला आता भीती वाटतेय, तातडीने लक्ष घाला”; पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी केला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वर शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कंपनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.  ईडीच्या या कारवाईचे स्वागत करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करून या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

“सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला”: शालिनीताई पाटील

पवार कुटुंबियांचा अनेक साखर कारखान्यांमध्ये घोटाळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबियांनी अनेक साखर कारखान्यांच्या व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला आहे. रोहित पवार यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये घोटाळा केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना ज्या पद्धतीने राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन गडबड करुन ५० कोटी रुपयांना रोहित पवार यांनी विकत घेतला. याचा पण तपास व्हायला हवा. या व्यवहारांची चौकशी व्हायला हवी. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यामध्ये मोठा तोटा झाला, असा दावाही सोमय्या यांनी यावेळी केला. 

शंभर अपराध भरले की फटका बसतोच

देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच. आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचे त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितले असता दुर्लक्ष करण्यात आले. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आले असते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारे कोणी नव्हते. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर गेला, गैरफायदा घेतला, असे शालिनीताई पाटील यांनी सांगितले. 


     

Web Title: kirit somaiya demand ed to investigate acquisition of kannad sahakari sakhar karkhana of rohit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.