मुंबई - सचिन वाझे प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तसेच सत्ताधारी महाविकास आघाडी सकारमधील नेत्यांची चिंता वाढली आहे.(Nawab Malik sensational claim about BJP & Sachin Vaze ) विरोधी पक्ष असलेला भाजपा या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर दररोज नवनवे आरोप करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर जोरदार पलटवार करत सनसनाटी आरोप केला आहे. ( " in 2004 the whole BJP was standing behind Sachin Vaze," a sensational claim by Nawab Malik)
आज लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्याला नवाब मलिक हे उपस्थि होते. यावेळी सचिन वाझे प्रकरणावरून भाजपाकडून शिवसेना आणि राज्य सरकारवर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, आज देवेंद्र फडणवीस हे शिवसेना सचिन वाझेंची बाजू घेतेय, म्हणून आरोप करत आहे. मात्र २००४ मध्ये जेव्हा सचिन वाझेंचे निलंबन झाले होते. तेव्हा संपूर्ण भाजपा सचिन वाझेंच्या बाजूने उभी राहिली होती. विधानसभेमध्येही सचिन वाझेंची बाजू घेतली जात होती. तेव्हा तुम्हाला सचिन वाझे चांगला वाटत होता. आता शिवसेनेवर खापर फोडताना आधी आपली भूमिका काय होती, हे भाजपानं सांगणं गरजेचं आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
दरम्यान, यावेळी उपस्थित असलेले राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण सचिन वाझे प्रकरणाबाबत म्हणाले की, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी आहे. तसेच सरकारमध्येही कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही आहे. तसं पाहायला गेले तर सचिन वाझे खूप लहान माणूस आहे. या प्रकरणानी निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या प्रकरणात सध्या भाजपा ट्रायल सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.