Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:14 AM2019-03-16T04:14:01+5:302019-03-16T04:16:47+5:30

शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे शिवधनुष्य अखेर डॉ. अमोल कोल्हे यांनी उचलल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Lok Sabha Election 2019: Actor Amol Kolhe will contest the fort of Shirur | Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

Lok Sabha Election 2019: अभिनेते अमोल कोल्हे शिरूरचा गड लढवणार

Next

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे शिवधनुष्य अखेर डॉ. अमोल कोल्हे यांनी उचलल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिलेदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांचा अपवाद वगळता कोणाचीच लढण्याची तयारी नव्हती.

डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सुरूवातीला ते उपनेते होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिली. मात्र, यापेक्षा अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे. जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी गावचे ते रहिवाशी आहेत.

कोल्हे यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरच त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. हडपसरमधील चेतन तुपे, सतीश मगर, शिरूर-हवेलीतील प्रदीप कंद, मंगलदास बांदल, भोसरीतून विलास लांडे यांच्या नावांची चर्चा होती. माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही नेहमीच येथून लढण्याचा आग्रह होतो. मात्र, सर्वांनाच विधानसभेत रस असल्याने लोकसभेसाठी त्यांची तयारी नव्हती.

Web Title: Lok Sabha Election 2019: Actor Amol Kolhe will contest the fort of Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.