नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर आज मतदान होत आहे. त्याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या निष्पक्षपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवालांनी अनेक युजर्सच्या ट्विटला रिट्विट करत निवडणूक निष्पक्षपणे होते आहे काय, असा प्रश्न विचारला आहे.केजरीवालांनी बायोकॉनची संस्थापक किरण मुजुमदार शॉ यांच्या ट्विटला रिट्वट करत सांगितलं की, भारतातल्या अनेक लोकांची नावं मतदारयादीतून काढण्यात आली आहेत, असा एक रिपोर्ट समोर आला आहे. सर्वच खराब ईव्हीएम मशिनमध्ये केलेलं मतदान हे भाजपाला जात असल्याचा आरोपही दुसऱ्या एका ट्विटला रिट्विट करत केजरीवालांनी केला आहे. ज्यांची नावं मतदारयादीतून काढण्यात आली आहेत, ते भाजपाचे विरोधक आहेत. सोशल मीडियावरही अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत.
अनेक मतदारांची नावं मतदारयादीतून काढली, केजरीवालांचा मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:59 PM