शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Lok Sabha Election 2019: मुंबईत युतीच्या विरोधात लागणार काँग्रेस आघाडीचा कस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 1:56 AM

मनसे, बहुजन आघाडी, एमआयएम फॅक्टर कितपत ठरणार प्रभावी?

मुंबई : निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर करताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच २९ एप्रिलला मतदान होईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा भाजपा शिवसेना युतीच्या पारड्यात गेल्या होत्या. यंदा मात्र युतीला आपल्या जागा राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. युती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.दहा वर्षांपूर्वी २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाच्या सहा जागा आघाडीला मिळाल्या होत्या. तर, २०१४ साली त्याच्या नेमके उलट निकाल आले आणि सर्व जागांवर भाजपा शिवसेना युतीने विजयाची नोंद केली. त्याला मोदी लाट आणि नव मतदारांचा घटक कारणीभूत ठरला. मागील दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही एकाच पारड्यात सहा जागा जाणार की नवी समीकरणांची नोंद होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपाने पद्धतशीरपणे संघटनात्मक ताकद वाढवली. त्याचा परिणाम पुढे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपाला झाला. तर, २०१४ सालच्या पराभवानंतर मरगळलेल्या काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी धुगधुगी निर्माण झाली आहे. त्यातच, राहुल गांधी यांच्या मुंबईच्या सभेनंतर पक्षातील गटबाजी काहीशी मागे पडल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा परंपरागत मतदार, भाजपाची वाढलेली ताकद, यासमोर काँग्रेसचा कस लागणार इतके नक्की. त्यातच, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचा सस्पेंन्स अद्याप कायम आहे. युती आणि आघाडीतील सरळ लढतींना प्रभावित करण्याची क्षमता या दोन्ही घटकांत आहे. मनसेने मोदीविरोधात बिगुल फुंकलेच आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानावरील याचा परिणाम पाहावा लागणार आहे. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि असदद्दीन ओवेसींच्या वंचित बहुजन आघाडीला आपल्याकडे वळविण्याचे मोठे काम काँग्रेस आघाडीला करावे लागणार आहे.दक्षिण मुंबईयुतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जातो. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार मिलींद देवरा यांचा पराभव केला होता. कॉस्मोपॉलीटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात गुजराती, राजस्थानी आणि मुस्लिम मते मोठ्या प्रमाणावर आहेत. युती झाली असली तरी भाजपाची पाठराखण करणारा हा वर्ग धनुष्य बाणासाठी बाहेर काढण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. शिवडी, वरळी या विधानसभा मतदारसंघासह मराठी पट्टयात शिवसेनेची स्वत:ची हक्काची मते आहेत. त्यामुळे उच्चभ्रू वर्गातील तसेच गुजराती, मारवाडी मते खेचण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. काँग्रेसच्या देवरा यांनी हक्काचा मतदारसंघ परत खेचण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने ओवेसींचा पतंग त्यांना आडवा जाणार का, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मुस्लिम मतांमध्ये फूट पडू नये आणि काँग्रेसचा परंपरागत मतदार सोबत राहील यासाठी देवरा यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेअरविंद सावंत (शिवसेना)- 3,74,609मिलिंद देवरा (काँग्रेस)- 2,46,045बाळा नांदगावकर (मनसे)- 84,773मीरा सन्याल (आप)- 40,298नोटा- 9,573दक्षिण मध्य मुंबईयुतीच्या घोषणा होऊन काही आठवडे उलटले तरी येथील पेच कायम होता. रामदास आठवले यांनी स्वत:साठी या जागेचा आग्रह धरला होता. शिवसेनेने ही मागणी फेटाळून लावली. मतदारसंघ सोडणार नाही आणि राहुल शेवाळेच आमचे उमेदवार असतील असे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. त्यामुळे युतीतील संभ्रम संपला आहे. काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड की भालचंद्र मुणगेकर ही नावे चर्चेत असली तर गायकवाडांना कौल मिळेल, अशी चिन्हे आहेत. धारावीसह मोठ्या प्रमाणावरील झोपडपट्टी, गरीब वस्त्यांमध्ये विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष कार्यरत आहेत. या स्थानिक नेत्यांचे स्वत:चे उपद्रवमुल्य आहे. तो सर्वच उमेदवारांना हाताळावा लागणार आहे. आघाडीने गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने पाचशे फुटांच्या घरांचे आश्वासन दिले आहे. त्याचा धारावी पट्टयात लाभ होऊ शकतो.२०१४ मध्ये मिळालेली मतेराहुल शेवाळे (शिवसेना)- 3,81,008एकनाथ गायकवाड (काँग्रेस)- 2,42,828आदित्य शिरोडकर (मनसे)- 73,096बी. सुंदर (आप)- 27,687गणेश अय्यर (बसपा)- 14,762उत्तर मुंबईभाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे नक्की झाले आहे. काँग्रेसचा उमेदवाराचा शोध मात्र अद्याप संपलेला नाही. संजय निरूपम यांनी शेजारच्या मतदारसंघात धाव घेतल्याने काँग्रेसची अडचण झाली आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने उत्तर मुंबईवरील आपली पकड मजबूत केली आहे. मुंबईतील भाजपाचा हा परंपरागत मतदारसंघ आहे. मोदी लाटेत तो आणखी भक्कम झाला. एक खासदार, चार आमदार आणि २४ नगरसेवक अशी लोकप्रतिनिधींची तगडी फौज असलेल्या या मतदारसंघावरील भाजपाची पकड स्पष्ट करायला पुरेशी आहे. दहिसर, मागाठाणेसह विविध भागातील शिवसेनेची मते भाजपाकडे वळायला फारशी अडचण नाही. मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते या मतदारसंघात यायला उत्सुक नाहीत. त्यामुळे विविध सेलिब्रिटींच्या नावाची सध्या तरी केवळ चर्चाच सुरू आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेगोपाळ शेट्टी (भाजपा)- 6,64,004संजय निरुपम (काँग्रेस)- 2,17,422सतीश जैन (आप)- 32,364नोटा- 8,758कमलेश यादव (सपा)- 5,506उत्तर पश्चिम मुंबई२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर तब्बल १ लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले. काँग्रेस उमेदवार गुरूदास कामत यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही मोदी लाटेला थोपवू शकली नाही. पाच वर्षांनंतर येथील समीकरणे पार उलटीपालटी झाली आहेत. गुरूदास कामतांच्या अकाली एक्झिटमुळे संजय निरूपम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीतील निरूपमांचे वजन वाढले असले तरी कामत गटाची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील राजकीय आघाड्या आणि पक्ष एकप्रकारे समदुखी अवस्थेत आहेत. युतीतील तणावाच्या काळात किर्तीकरांनी स्थानिक भाजपा आमदारांविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान किर्तीकरांसमोर असणार आहे. तर, तिकडे निरूपम यांना कामत गटाला जवळ करावे लागणार आहे. किमान या गटाचे उपद्रवमुल्य तरी ते कमी करू शकतात का, यावर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.२०१४ मध्ये मिळालेली मतेगजानन कीर्तिकर (शिवसेना)- 4,64,820गुरूदास कामत (काँग्रेस)- 2,81,792महेश मांजरेकर (मनसे)- 66,088मयांक गांधी (आप)- 51,860नोटा- 11,009उत्तर मध्य मुंबईएकेकाळचा काँग्रेसचा हा बालेकिल्ला होता़ मोदी लाटेत येथे भाजपाच्या पूनम महाजन विजयी झाल्या. मतदारसंघातील उत्तर भारतीय आणि मुस्लिम समीकरण काँग्रेसच्या जमेची बाब होती. शिवाय, उच्चभ्रू वर्गात दिवंगत सुनिल दत्त यांचा प्रभावही होता. पुढे प्रिया दत्त यांनाही त्याचा लाभ मिळाला. मोदी लाटेत ही समीकरणे बदलून गेली. उत्तर भारतीय मतदार भाजपाकडे सरकला. पूनम महाजन पुन्हा एकदा रिंगणात आहेत. काँग्रेसच्या गोटात मात्र संभ्रम आणि संशयाचे वाातावरण आहे. गटबाजीमुळे दत्त यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न उच्चस्तरावरून झाले. त्यामुळे दत्त पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे समजते. मात्र, मधल्या काळात संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षाचा त्यांना फटका बसू शकतो.२०१४ मध्ये मिळालेली मतेपूनम महाजन (भाजपा)- 4,78,535प्रिया दत्त (काँग्रेस)- 2,91,764फिरोज पालखीवाला (आप)- 34,824आनंद शिंदे (बसपा)- 10,128आनंद शिंदे (सपा)- 9,873उत्तर पूर्व मुंबईभाजपाचे किरीट सोमय्या या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत़ पक्ष नेतृत्त्वाची खप्पा मर्जी झाल्याने यंदा त्यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा होती. स्वयंसेवी संस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून सोमय्या यांनी मोठे जाळे उभारले असले तरी मराठी अमराठी वादातील त्यांची भूमिका त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात मुंबईतील ही एकमेव जागा राष्ट्रवादीकडे जाते. राष्ट्रवादीकडून संजय दिना पाटील यांना पुन्हा संधी मिळणार हे नक्की झाले आहे. मात्र, मधल्या काळात मनसेने ही जागा मागितली होती. मात्र, मनसेला आघाडीत घेण्यास काँग्रेसने साफ नकार दिला. त्यामुळे भाजपाविरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत याठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार मराठी विरूद्ध अमराठी असा सरकला तर भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे भाषिक मुद्दे प्रचारात येणार नाहीत, राष्ट्रीय विषयांवर रोख राहील याची भाजपाला काळजी घ्यावी लागणार आहे.२०१४ मध्ये मिळालेली मतेकिरीट सोमय्या (भाजपा)- 5,25,285संजय दिना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)- 2,08,163मेधा पाटकर (आप)- 76,451मच्छिंद्र चाटे (बसपा)- 17,427अविनाश डोळस (भारिप बहुजन महासंघ)- 8,833२००९ सालातील आकडेवारीउत्तर मुंबईसंजय निरूपम (काँग्रेस)- २,५५,१५७राम नाईक (भाजपा)- २,४९,३७८उत्तर पश्चिम मुंबईगुरूदास कामत (काँग्रेस)- २,५३,८९९गजानन किर्तीकर (शिवसेना)- २,१५,४८४उत्तर पूर्व मुंबईसंजय दिना पाटील (राष्ट्रवादी)- २,१३,५०५किरीट सोमय्या (भाजपा)- २,१०,५७२उत्तर मध्य मुंबईप्रिया दत्त (काँग्रेस)- ३,२२,०४०महेश जेठमलानी (भाजपा)- १,४४,१६२दक्षिण मध्य मुंबईएकनाथ गायकवाड (काँग्रेस)- २,५७,५२३सुरेश गंभीर (शिवसेना)- १,८१,८१७दक्षिण मुंबईमिलिंद देवरा (काँग्रेस)- २,७२,४११बाळा नांदगावकर (मनसे)- १,६९,७९०

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMNSमनसे