मोदींना मत म्हणजे पाकिस्तानलाच मत; इम्रानच्या 'बॉलिंग'नंतर काँग्रेसची 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 05:16 PM2019-04-10T17:16:03+5:302019-04-10T17:23:07+5:30
पाकिस्तानची मोदींबरोबर अधिकृतरीत्या तडजोड झालेली आहे.
नवी दिल्ली- इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर आता काँग्रेसनं मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानची मोदींबरोबर अधिकृतरीत्या तडजोड झालेली आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत मोदींना मतदान केल्यास ते पाकिस्तानला मत देण्यासारखंच ठरेल, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानशी मोदींबरोबर अधिकृतरीत्या बोलणी झालेली आहेत. त्यामुळे मोदींना मत दिल्यास ते पाकिस्तानलाच मत समजलं जाईल. नवाज शरीफांचं मोदींवर प्रेम होते आणि आता इम्रान खानही मोदींचे फॅन आहेत. त्यामुळे मोदींची पोलखोल झाली आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता.
Pak has officially allied with Modi!
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 10, 2019
‘A vote for Modi is a vote for Pakistan’, says Pak PM Imran Khan
मोदीजी, पहले नवाज़ शरीफ़ से प्यार और अब ईमरान खान आपका चहेता यार!
ढोल की पोल खुल गयी है।
https://t.co/Qg1a2Hl0Q1
पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास शांततेच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे.
'भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर उत्तर दिलं नसतं तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही' असं काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने बाराहून अधिक दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी विचारलं असता, तो खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही आहे असं त्यांनी सांगितलं.