शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचलो; अमित शहांची आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 12:34 IST

भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अमित शहांची तृणमूलवर जोरदार टीका

नवी दिल्ली: भाजपा अध्यक्ष अमित शहांनी कोलकात्यातल्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन तृणमूल काँग्रेसवर शरसंधान साधलं. भाजपाच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसत असल्यानं हिंसाचाराचा आधार घेतला जात आहे. पण पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता नाही. राज्यातलं तृणमूल सरकार जनताच हटवेल, असं शहा म्हणाले. नशीब बलवत्तर होतं म्हणून काल मी वाचलो, अशा शब्दांत शहांनी आपबिती सांगितली. 'काल कोलकात्यात भाजपाचा रोड शो सुरू होण्याआधी तृणमूलच्या गुडांनी भाजपाचे पोस्टर फाडले. पण पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. भाजपाचा रोड शो सुरू होताच तृणमूलकडून हिंसाचार सुरू झाला. त्या ठिकाणी सीआरपीएफचे जवान नसते, तर तिथून निघणं कठीण झालं असतं. तृणमूलच्या गुंडांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माझं नशीब चांगलं असल्यानं मी तिथून योग्य वेळी निघालो,' असं शहा म्हणाले. संपूर्ण देशात निवडणूक झाली. पण केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंसाचार का झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही देशभरात निवडणूक लढवली. पण तिथे हिंसाचार झाला नाही. कारण तिथे तृणमूल नाही. फक्त पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. कारण केवळ याच राज्यात तृणमूल सत्तेत आहे, अशी टीका शहांनी केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनाही लक्ष्य केलं. दीदी, मी स्वत:ला देव समजत नाही. पण तुम्हीही समजू नका. कालच्या रॅलीत हिंसाचार झाला. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. पण हिंसाचाराचा जितका चिखल फेकाल, तितकं कमळ जोमानं फुलेल, हे दीदींनी लक्षात ठेवावं' असं शहा यांनी म्हटलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी