शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Lok Sabha Election 2019: माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना; भाजपाचं गुपित कळेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:59 AM

मुख्यमंत्री अन् संजय शिंदेंची भेट; मामांना लढवायचीय विधानसभा

- नितीन काळेलसातारा : माढा मतदारसंघाचा तिढा सतत वाढत असून, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरता ठरेना. तर दुसरीकडे भाजपचा बहुतांशी निर्णय राष्ट्रवादीवर अवलंबून असल्याने त्यांचंही गुमान कळेना, अशी स्थिती आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली; पण मामांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे तिढा कायम असून, अशा घटनांमुळे दररोज घडतंय बिघडतंय असे चित्र आहे.मागील दोन निवडणुकीपेक्षा यंदाची माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणखी रंगतदार बनू शकते, असेच वातावरण आहे. कारण, आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, सतत नवनव्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव मागे पडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हेच माढ्यातून उतरू पाहत होते; पण मतदारांचा वाढता विरोध पाहता त्यांनीही माढ्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे आताही राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह यांचे नाव उमदेवार म्हणून पुढे आले; पण ठोस असे काहीच होत नाही. त्यातच प्रभाकर देशमुख यांनाही लॉटरी लागेल, असे सांगण्यात येते; पण मोहिते-पाटील हे देशमुखांचे काम करणार का? हाही प्रश्न आहे. तसेच मोहिते-पाटील पितापुत्रापैकी कोणा एकाला उमेदवारी मिळाली तर माळशिरस तालुक्यातील त्यांचे विरोधक जोरदार विरोध करणार, हे ठरलेले आहेच. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करण्याची आशाही नाही. अशा स्थितीत राष्ट्रवादीला उमेदवार देताना व निवडून आणताना यावेळी खूपच दमछाक करावी लागणार आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत अनेकांना मानवणारा असा उमेदवार देणेच राष्ट्रवादीला परवडणार आहे.दुसरीकडे भाजपचे बरेचसे गणित हे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते, त्यावर अवलंबून आहे. सध्या फक्त भाजप बघ्याच्या भूमिकेत आहे. शरद पवार हे उतरणार म्हटल्यावर भाजपात शांत वातावरण होते; पण पवारांनी माघार घेतल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अ‍ॅक्टीव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तोडीस तोड उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यावेळी माढा मतदारसंघातील दुष्काळात कमळ फुलविण्याची आलेली संधी दवडायची नाही, अशीच तयारी असल्याचे दिसून येत आहे. अशा सर्व घनशाघोळात माढा मतदारसंघातील राजकीय चित्र दररोज नवनवे वळणे घेताना दिसत आहे.माढ्यात सध्या राजकीय चित्र सतत बदलत असून, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतून कोण आणि भाजप-सेना युतीतून कोण रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी माढ्यातून लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर इच्छुकांनी जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा