शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 9:26 AM

बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाला क्लीन चिट

नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहाव्यांदा क्लीन चिट दिली आहे. मोदींनी गुजरातच्या पाटणमध्ये केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचा भंग न झाल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला. पाकिस्ताननं हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांची सुटका केली नसती, तर ती हत्येची रात्र ठरली असती, असं विधान मोदींनी 21 एप्रिलला केलं होतं. मोदींच्या या विधानाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी गुजरातच्या पाटणमध्ये जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या बालाकोटवरील कारवाईचा संदर्भ दिला. 'पाकिस्ताननं भारताच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानची विमानं त्याच मनसुब्यानं आली होती. मात्र भारतीय हवाई दलानं त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानचं एक विमानदेखील भारतानं उद्ध्वस्त केलं,' असं मोदी पाटणमधल्या सभेत म्हणाले होते. पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांची सुटका केली नसती, तर ती कतल की रात ठरली असती, असंदेखील मोदींनी पुढे म्हटलं होतं. 'मोदी 12 क्षेपणास्त्र घेऊन तयार होते. पाकिस्ताननं अभिनंदन यांची सुखरुप सुटका केली नसती, तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती,' या मोदींच्या विधानाबद्दल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आक्षेप नोंदवला होता. मोदींकडून लष्कराचा आणि बालाकोट एअर स्ट्राइकचा राजकीय वापर सुरू असल्याची तक्रार दोन्ही पक्षांनी केली होती. त्याआधी राजस्थानच्या बारमेरमध्ये मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला होता. आमच्याकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या विधानालाही निवडणूक आयोगानं क्लीन चिट दिली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानBJPभाजपाcongressकाँग्रेस