चंदोली: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधलं आहे. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेनं मनाशी ठरवलं आहे, असं मोदी उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमधल्या जनसभेला संबोधित करताना म्हणाले. ज्यांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत, असा टोला लगावत मोदींनी महाआघाडीतल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केलं. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेनं ठरवलं आहे, असं मोदींनी म्हटलं. देशाला स्थिर सरकार कसं देणार याचं उत्तर अद्याप विरोधकांच्या आघाडीला सापडलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी महाआघाडीला लक्ष्य केलं. विरोधकांची महाआघाडी महामिलावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
8-10 जागा मिळवणारेदेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहताहेत- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 14:06 IST