शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

26 तारखेला शपथ घेणार मोदी? तारखेमागे अनोखं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 7:54 PM

मोदी 26 तारखेला शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपाला धक्का बसल्यास संधी साधण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. तर भाजपानं एनडीएतील सहकाऱ्यांसोबत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. आज भाजपानं दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 26 मे रोजी मोदी शपथ घेऊ शकतात. 8 हा आकडा मोदींसाठी शुभ आहे. 26 या तारखेतील दोन अंकांची बेरीज 8 होते. त्यामुळे मोदी 26 तारखेला शपथ घेतील, अशी चर्चा दिल्लीत आहे. 2014 मध्येही मोदींनी 26 तारखेलाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. भाजपानं आज एनडीएमधील घटक पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर आलेल्या विविध एक्झिट पोल्सनी भाजपाच सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला. तेव्हापासून भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं मित्र पक्षांसाठी आज डिनरचं आयोजन केलं आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा