शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Lok Sabha Election 2019: सांगलीत युती, आघाडीत होणार अस्तित्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:39 AM

बालेकिल्ला काँग्रेसचा की भाजपचा, ठरविणारी लढत

- अविनाश कोळीसांगली : प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपने बाजी मारत हा किल्ला ताब्यात घेतला होता. या पराभवास मोदी लाटेचे कारण पुढे करीत काँग्रेसने यंदा पुन्हा हा गड ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, ही ठरविणारी ही निवडणूक असून युती व आघाडीच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात २०१४ पर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पराभूत झालेली नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा विक्रमी मतांनी पराभव करीत भाजपचे संजय पाटील निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्याने भाजपच्या नेत्यांचे बळ वाढले. गेल्या पाच वर्षात भाजपने येथील दबदबा कायम ठेवला, मात्र काँग्रेसनेही विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वाची लढाई सुरू ठेवली. २०१४ मधील भाजपला मिळालेले यश हे मोदी लाटेमुळे मिळाल्याचा प्रचार काँग्रेसने सुरू ठेवला.त्यामुळे काँग्रेसने हा बालेकिल्ला पुन्हा बळकावण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. त्यांना आता राष्टÑवादीचेही बळ मिळाले आहे.गत निवडणुकीत भाजपला राष्टÑवादीनेही छुपी साथ दिल्याची चर्चा होती. यंदा राष्टÑवादीची राज्यभराची धुरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. सांगली-मिरज महापालिकेत त्यांच्या पदरी अपयश आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्याही बळाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे राष्टÑवादी या निवडणुकीत प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. काँग्रेसने ताकद एकवटली असली तरी, सक्षम उमेदवाराची चिंता त्यांना अजूनही सतावत आहे. प्रतीक पाटील यांच्या जिल्ह्यातील संपर्कावरून पक्षांतर्गत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेसुद्धा इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. तरीही या दोघांव्यतिरिक्ति आमदार विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या पर्यायाची चाचपणीही पक्षाने केली आहे. तरीही त्यांना अद्याप उमेदवारीचा घोळ मिटविता आलेला नाही.भाजपकडे अनेक सक्षम पर्याय असले तरी, विद्यमान खासदार संजय पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. भाजपने या मतदारसंघासाठी पूर्वतयारी केली आहे. या मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे जे सहा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यातील तीन जागा भाजपकडे, एक शिवसेनेकडे व अन्य काँग्रेस, राष्टÑवादीकडे आहेत. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात युतीचे पारडे जड आहे.भाजपला गटबाजीचे ग्रहणगेल्या पाच वर्षात अनेक घडामोडींमुळे युतीच्या ताकदीबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अजितराव घोरपडे हे सध्या नाराज आहेत. मिरज मतदारसंघात भाजपअंतर्गत गटबाजी उफाळली आहे. जत व खानापूर-आटपाडी मतदारसंघातही भाजपमध्ये उघडपणे गटबाजी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला २0१४ च्या तुलनेत यंदा अधिक संघर्ष करावा लागणार आहे. भाजपअंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस व राष्टÑवादीकडून सुरू आहे. त्याला यश मिळाले तर भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते.गत निवडणुकीतील परिस्थितीउमेदवार पक्ष मते टक्केसंजय पाटील भाजप   ६,११,५६३   ५८.४३प्रतीक पाटील कॉंग्रेस  ३,७२,२६१  ३५.५७

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस