>> अभय नरहर जोशी
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...आरोपांचे धूर हवेत काढी‘नमों’ची क्लिपिंग पाहूया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजा’ करती वार मोठेम्हणती ‘नमो’ आहेत खोटे‘कमळी’स होणार का तोटे?सगळे ऐकून घेऊया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’चे इंजिन दिमाखदार‘घड्याळा’नुसार धावणारभलतेच डबे हे जोडणार‘पंजा’चे सिग्नल पाळूया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’चे बोलणे धारदारत्यांची पोरं खोडकर फार‘कमळी’ची छेड काढणारटोकाचा बदल अनुभवूया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’ची रेल्वे पॅसेंजर थांबे कुठल्याही स्टेशनवरजेव्हा येईल आपले घरतेव्हा उतरून घेऊया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’ना गर्दी खेचण्याची नॅकपोरांना जमते ‘खळखट्याक’टाळ्या-शिट्ट्या ऐकूया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’चे जाहीर प्रेझेंटेशनत्याच त्याच मुद्द्यांचे शिकरणनवीन मुद्दा शोधूया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजा’ मोठा कलाकाररेषेला त्यांच्या वेगळीच धारमनसोक्त हसून घेऊया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
‘राजां’च्या आवाहनात कळकळत्यांची नवनिर्माण चळवळदिशा ही समजून घेऊया‘राजां’च्या सभेला जाऊया...
झुक झुक झुक झुक अगीनगाडी...