मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनिल राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. किरीट सोमय्यांना तिकीट देण्यात आल्यास त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. 'वेळ पडल्यास मी अपक्ष लढेन. पण मी सोमय्यांविरोधात 100 टक्के निवडणूक लढवणार,' असा निर्धार राऊत यांनी बोलून दाखवला. त्यामुळे किरीट सोमय्यांची डोकेदुखी वाढली आहे.
किरीट सोमय्यांविरोधात निवडणूक लढणार; शिवसेना आमदारानं दंड थोपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 12:53 PM