नवी दिल्ली- घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. भाजपाकडून घराणेशाहीच्या बाबतीत काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. परंतु घराणेशाहीमध्ये भाजपाहीकाँग्रेसच्या पुढे असल्याचं आता एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. इंडियास्पेंडच्या रिपोर्टनुसार, गेल्या 20 वर्षांत भाजपामध्येही घराणेशाही मजबूत झाली आहे. विशेष म्हणजे घराणेशाहीमध्ये भाजपानं काँग्रेसलाही मागे टाकले आहे.13व्या लोकसभा(1999)मध्ये काँग्रेस 36 खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित होते. त्यावेळी भाजपा काँग्रेसच्या फार मागे नव्हता. भाजपाचे 31 खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित आहेत. 2009मध्येही घराणेशाहीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे 12 टक्के, तर भाजपाचे 11 टक्के खासदार हे राजकीय परिवाराशी संबंधित आहेत. 2004मध्ये काँग्रेसची घराणेशाही भाजपाच्या दोन टक्के जास्त होती. 14व्या लोकसभेत भाजपाचे 7 टक्के, तर काँग्रेस 13 टक्के खासदार घराणेशाहीतून आलेले होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं सर्वाधिक काळ सत्ता उपभोगली आहे.काँग्रेसनं नेहरू-गांधी घराण्याचा राजकीय वारसा पाहता भाऊ आणि पुतण्याच्या घराणेशाहीला जास्त प्रोत्साहन दिल्याचाही त्यांच्यावर आरोप होतोय. इंडियास्पेंडनं या प्रकरणात अमेरिकेतील हॉवर्ड आणि जर्मनीतल्या मॅनहायम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा हवाला दिला आहे. हॉवर्ड युनिव्हर्सिटीत पीएचडी करणारे सिद्धार्थ जॉर्ज म्हणाले, काँग्रेसच्या तुलनेत भाजपामध्ये घराणेशाही दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. सिद्धार्थ सांगतात, सुरुवातीच्या काळात भाजपा काँग्रेसपेक्षा छोटा पक्ष असला तरी आता सर्वात मोठा पक्ष झाला आहे. घराणेशाहीच्या आधारावर आई-वडील, बहीण-भाऊ, मुलं-मुली सहभागी आहेत. विशेष म्हणजे या रिपोर्टमध्ये फक्त आई-वडील आणि मुला-मुलींचाच समावेश करण्यात आला आहे.
घराणेशाहीत भाजपाही वरचढ, काँग्रेसला पछाडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 8:47 PM