पाटणा: भाजपाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं काय असतं, असा सवाल राहुल यांनी एका सभेत विचारला होता. राहुल यांच्या विधानावर सुशील कुमार मोदींनी तीव्र आक्षेप घेतला. 'मोदी आडनावाच्या सर्व व्यक्तींना चोर म्हणणाऱ्या राहुल यांच्या विधानावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे,' असं सुशील कुमार मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यंदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ 2014 पेक्षाही मोठी लाट असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळेच महामिलावटी गठबंधनचे नेते पराभवाचं खापर फोडण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा पुढे करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
सर्व चोरांचं आडनाव मोदीच कसं?; राहुल गांधींच्या विधानाविरोधात लवकरच अब्रू नुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:40 IST