शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात?; काँग्रेस म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 9:02 PM

सभांच्या खर्चाबद्दल भाजपाचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सत्याचा प्रचार केला जात असल्याने मोदी आणि शाह या जोडीचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडत चालला आहे. यामुळे जनमत दूर चालल्याने, हतबलतेतून भाजपाकडून राज ठाकरेंच्या सभेवर होणाऱ्या खर्चावर आक्षेप घेतला जात असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आपला काहीही संबंध नाही हे राज ठाकरे यांनी स्वत:च स्पष्ट केले आहे. मोदी शाह यांच्या विचारधारेतून मुक्त होणे यातच देशहित आहे. मोदी शाह यांच्या विचारधारेमुळे जनतेच्या मनात भाजपाबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपाचा घसरलेला पाय सावरण्याकरता त्या पक्षाचीही मोदी शाह यांच्या विचारांपासून सुटका होण्याची गरज आहे, असे सचिन सावंत म्हणाले. राज ठाकरेंमुळे देशहिताबरोबरच भाजपचे हित जोपासले जात असल्याने राज ठाकरेंच्या सभांचा खर्च भाजपाने आपल्या नावावर उचलला तरी काय हरकत आहे? अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. राज ठाकरेंच्या सभांबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मनसे एकही जागा लढवत नसताना राज ठाकरे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. राज यांच्या सभा कोणासाठी आहेत? या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात दाखवणार? असे प्रश्न विचारत तावडेंनी निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र भाजपा लोकसभा निवडणूक व्यवस्थापनाच्या समितीच्या वतीने तावडेंनी हे पत्र लिहिले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेcongressकाँग्रेसVinod Tawdeविनोद तावडेAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी